मानले यांचे आभार
राम यांनी ट्विट करत सोनिया गांधी यांनी म्हटलेलं वाक्य खरं असल्याचं म्हटलं आहे आणि सोबतच त्यांचे चरण स्पर्श करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासोबत त्यांनी नरेंद्र मोदी यांना ‘मौत का सौदागर’ म्हणत करोनाच्या तिसऱ्या लाटेत मृतदेह मोजण्याचं काम मागितलं आहे. राम यांनी ट्विट करत लिहिलं. ‘२०१४ साली सोनिया गांधी नरेंद्र मोदी यांना मौत का सौदागर म्हटल्या होत्या…! मला माहित नव्हतं की त्या एवढं चांगलं भविष्य सांगू शकतात. मी तुमची माफी मागतो सोनियाजी आणि जर शक्य असेल तर मला तुमच्या पायांचा फोटो पाठवा जेणेकरून मी तुमच्या चरणांना स्पर्श करून पाया पडू शकतो.’
नरेंद्र मोदी यांना म्हटलं ‘मौत का सौदागर’
राम यांनी ट्विट करत लिहिलं, ‘तसं तर मी एक साधा भयपट बनवणारा दिग्दर्शक आहे पण मला तुमच्या ‘करोनाची तिसरी लाट’ या चित्रपटात एका स्पॉट बॉयचं काम देण्याची विनंती करतो. किंवा मी फक्त एका कारकुनाची नोकरी करायलाही तयार आहे जो मृतदेह मोजायचं काम करेल. कारण मलाही तुमच्यासारखं मृतदेह बघायला आवडतात मग ते कोणत्याही कारणामुळे असुदे.’ असं म्हणत राम यांनी देशातील परिस्थितीसाठी पंतप्रधानांना जबाबदार धरलं आहे. त्यांना देशातील परिस्थितीची जाणीव करून देत नागरिकांच्या डोळ्यातही अंजन टाकण्याचं काम केलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times