मुंबईः पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक निकालाचे कल आता स्पष्ट होऊ लागले आहेत. यांचा पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमुल पक्ष तिसऱ्यांदा सत्तेवर येणार असल्याचं चित्र आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिवसेनेचे खासदार यांनीही ममता बॅनर्जी यांचा विजय हा ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे. तसंच, ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केलं आहे.( on )

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारत बहुमताचा आकडा पार केला आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. संजय राऊत यांनीही भाजपवर निशाणा साधत पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर भाष्य केलं आहे.

‘पश्चिम बंगालचा निकाल हा बंगालमध्ये ज्या प्रकारचं वादळ किंवा कृत्रिम हवा भाजप नेत्यांनी निर्माण केली होती. त्या सगळ्या पोकळ वादळाचा हा पराभव आहे. एका जखमी वाघिणीनं हा एकहाती विजय खेचून आणला आहे. देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारा हा विजय आहे,’ अशा शब्दांत संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांचं कौतुक केलं आहे.

‘पश्चिम बंगालमध्ये सरकारी यंत्रणाचा वापर केला गेला, देशभरातून केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्र्यांना तिथं बसवून देशात करोनाचं संकट असताना पंतप्रधान, गृहमंत्री जिथं तळ ठोकून बसले. करोनाचे नियम मोडून पश्चिम बंगालमध्ये शक्तीप्रदर्शन सुरु होतं. पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या बदल्यात देशाला करोना दिला. मद्रास हायकोर्टानंही त्यांच्यावर ताशेरे ओढले होते, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच, जनता जेव्हा शहाणपणानं मतदान करते तेव्हा त्या शहाणपाणापुढं कोणाचाही पराभव होऊ शकत नाही,’ अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे.

‘पश्चिम बंगालमध्ये भाजप विजयी झाला तर महाराष्ट्रात भूकंप येईल असं काहींना वाटतं होतं. पण असं काही झालं नाही महाराष्ट्रातील सर्व लोक पश्चिम बंगालच्या निकालासाठी आनंदी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा दिल्या आहेत,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

‘ममता बॅनर्जींकडे देश आशेनं बघतोय. ममता बॅनर्जी यांच्या विजयानं देशातील विरोधी पक्षाला एक उर्जा मिळाली आहे. ममता बॅनर्जीनं पूर्ण देशाला एक संदेश दिला आहे. त्यांनी हे दाखवून दिलंय की देशात पंतप्रधान मोदी व अमीत शहा हेच अजिंक्य नाहीत आम्ही त्यांनाही पराभूत करु शकतो,’ असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

पंढरपूर निवडणूकीमुळं महाविकास आघाडीला धक्का

पंढरपूरची जागा भाजपला द्या मग महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करतो, असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘करेक्ट कार्यक्रमाला सुरुवात करायची असेल तर त्यांनी ती सुरुवात करावी. आमचा पण कार्यक्रम ठरलेला आहे, असं राऊतांनी म्हटलं आहे, तसंच, तीन पक्ष एकत्र आल्यावर आम्ही विजयी व्हायला हवं होतं. कारण आमचं मताधिक्य वाढलं असतं पण काही स्थानिक गणितं असतात. त्या गणितांचा अभ्यास करता महाविकास आघाडीला धक्का बसला आहे, असंही राऊतांनी म्हटलं आहे. पंढरपूरच्या निकालानं सरकार बदलणार नाही, असंही त्यांनी सूचित केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here