म. टा. प्रतिनिधी, जळगाव: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक ही भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पण तरी तेथील जनतेने पुन्हा एकदा यांच्या तृणमूल काँग्रेसला कौल देत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले असल्याची प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी दिली. एकनाथ खडसे यांनी रविवारी मुक्ताईनगरात त्यांच्या फार्महाऊसवर पत्रकारांशी बोलतांना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आपले मत मांडले.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारत बहुमताचा आकडा पार केला आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ममता बॅनर्जी यांनीही नंदीग्राममध्ये विजय मिळवला आहे. ममता बॅनर्जी यांच्या यशावर राष्ट्रीय पातळीवरुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीही ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन करत भाजपलावर मात्र टीकास्त्र सोडलं आहे.

पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालात ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला दोन तृतीयांश बहुमत मिळणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. ही निवडणूक भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच भाजपचे देशभरातील प्रमुख कार्यकर्ते प्रचारात उतरले होते. तेथील सत्ता काबीज करावी, या दृष्टीने भाजप रिंगणात उतरला होता. पण जनतेने पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसवर विश्वास दाखवत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here