मुंबईः पश्चिम बंगाल निवडणुकांचा निकाल आज समोर आला आहे. पश्चिम बंगालमधील जनतेनं पुन्हा एकदा यांनी एकहाती विजय मिळवला आहे. ममता बॅनर्जी यांच्या विजयानंतर राज्यातील राजकीय वर्तुळातही चर्चा सुरु आहे. ममता बॅनर्जी यांना निवडणुकीत शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या मदत केल्याची चर्चा आता राज्यात सुरु आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीच तसं ट्वीट केल्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

पश्चिम बंगालमध्ये शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसनंही पाठिंबा दर्शवला होता. तसंच, ममता बॅनर्जी यांच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळं त्यांना दौरा रद्द करावा लागला होता. तसंच, ममता बॅनर्जी यांच्या विजयानंतर शरद पवारांनी अभिनंदनही केलं होतं. तर, निकलानंतरच्या गोंधळावरही त्यांनी रोखठोक मत व्यक्त केलं होतं. आता या सर्व घडामोडींनतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट केलं आहे.

पश्चिम बंगालच्या निकालावर भाजपचे निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी एक गौप्यस्फोट केल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. ‘शरद पवारांनी सर्व भाजपविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडल्यानं मतविभागणी रोखली गेली. त्याचा फटका भाजपला बसलाय, असं कैलास विजयवर्गी यांनी म्हटलं असल्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे. विजयवर्गी यांनी केलेल्या विधानाचा अर्थ पश्चिम बंगालच्या निवडणुकीत शरद पवारांचा अदृश्य हात होता,’ असं आव्हाडांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या ट्विटनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार म्हणून पवारांना श्रेय दिलं जातं. त्याप्रमाण पश्चिम बंगालच्या विजयामागेही शरद पवारांचा हात असल्याची चर्चा आता सुरु आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here