मुंबईः पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान अवताडेंचा विजय झाला आहे. भाजपचा विजयाचा मोठा धक्का महाविकास आघाडीला बसला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे

राष्ट्रवादीचे आमदार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली होत. ही जागा २००९पासून सलग तीनवेळा भारत भालके यांनी जिंकली होती. पोटनिवडणुकीत त्यांचे चिरंजीव भगिरथ यांना पक्षाने उमेदवारी दिली मात्र त्यांचा येथे पराभव झाला. दरम्यान विजयी झालेले भाजपाचे समाधान आवताडे हे २०१४ पासून या मतदारसंघात नशीब आजमावत आहेत. त्यांना तिसर्‍या निवडणुकीत विजय मिळविता आला आहे. भाजपच्या या विजयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाष्य केलं आहे.

‘भारतनाना माफ करा. तुम्ही केलेली सेवा भक्त पुंडलिकरुपी असली तरी तुमच्या सेवेपेक्षा मसल आणि मनीपॉवर वापरुन भाजपाने लढवलेली ही निवडणुक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती. पैसा व सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली. नाना तुमच्या प्रामाणकसेवेला पैशानं हरवले,’ असं ट्वीट अमोल मिटकरींनी केलं आहे.

दरम्यान, सार्‍या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपुर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे समाधान आवताडे हे ३ हजार ७३३ मतांनी विजयी झाले असून राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा येथे पराभव झाला आहे. पंढरपूर मतदारसंघात प्रथमच भाजपाने विजय मिळवला आहे. अर्धे मंत्रिमंडळ प्रचारात उतारावणाऱ्या अजित पवार यांच्यासाठी हा पराभव धक्का मानला जात आहे. पंढरपूर शहर व परिसरातील गावांनी या निवडणुकीत अवताडे यांना साथ दिली असून यासाठी आमदार प्रशांत परिचारक व त्यांचे बंधू उमेश यांनी जोरदार व्यूहरचना आखली होती. यामुळे भागातून चांगली मतं भाजपाला मिळाली आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here