नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामवर व्हायरसचा धोका वाढत चालला आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघातील दोन खेळाडू आणि चेन्नई सुपर किंग्ज संघातील स्टाफ मेंबर पैकी तिघांना करोनाची लागण झाल्याचे वृत्तापाठोपाठ आज (सोमवार) आयपीएलसाठी तिसरा मोठा धक्का बसला.

वाचा-

सोमवारी सकाळी सर्व प्रथम कोलकाता नाइट रायडर्स संघातील दोन खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना करोना झाल्याचे वृत्त समोर आले होते. यामुळे आज होणारी कोलकाता आणि बेंगळुरू मॅच पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघातील तिघांना करोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले. यात संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ, लक्ष्मीपती बालाजी आणि एक बस क्लीनरचा समावेश आहे. दिलासा देणारी एक गोष्ट म्हणजे, संघातील कोणत्याही खेळाडूला किंवा अन्य कोणालाही करोनाची लागण झालेली नाही. हे सर्व खेळाडू दिल्लीत आहेत.

वाचा-

आता आलेल्या वृत्तानुसार दिल्लीतील अरुण जेठली स्टेडियममधील पाच ग्राउंड स्टाफना करोना झाला आहे. यामुळे दिल्लीत होणाऱ्या आयपीएलच्या लढती ८ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आल्याचे वृत्त आहे. पण बीसीसीायने अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेले नाही.

वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here