मुंबई : ‘’ नेहमीच आपल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तत्पर असते. सदाबहार चित्रपट, मनोरंजक कार्यक्रम सादर करत ही वाहिनी प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. त्यामुळे ‘झी टॉकीज’ ही सर्व वयोगटातील प्रेक्षकांची आवडती वाहिनी ठरली आहे.

‘झी टॉकीज’ आपल्या चिमुरड्या प्रेक्षकांसाठी एक खास सरप्राईज घेऊन आली आहे. सध्या बच्चेकंपनीच्या शाळांना सुट्टी लागली आहे. करोनामुळे कुठेही बाहेर जाता येत नसल्याने सर्व लहान मुले घरात बसून बसून कंटाळली आहेत. मित्रमंडळींबरोबर बाहेर खेळायला जात येत नाही, की बाहेर भटकायलाही जाता येत नाही. अशा सगळ्या वातावरणामध्ये ही लहान मुले खूपच वैतागली आहेत, कंटाळली आहेत. या चिमुरड्यांना आलेला कंटाळा पळून जावा आणि त्यांच्याही चार घटका मजेत आणि आनंदात जाव्यात या उद्देशाने झी टॉकीजवर या आठवड्यात खास बच्चे कंपनीसाठी चित्रपट प्रसारित केले जाणार आहेत.

रोज ११ वाजता बालमित्रांना त्यांच्या आवडत्या चित्रपटांची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. मंगळवार ४ मे रोजी ‘ताऱ्यांचे बेट’ हा सिनेमा, बुधवारी ५ मे रोजी ‘चॅम्पियन्स’, तर ६ मे रोजी ” हे चित्रपट प्रसारित होणार आहेत. या विशेष फिल्म फेस्टिवलचा शेवटच्या दिवशी म्हणजे गुरुवारी, ६ मे रोजी ” या सुपरहिट चित्रपट प्रसारित केला जाणार आहे. तेव्हा धमाल मजा मस्ती सोबत पाहायला विसरू नका विसरू नका बच्चे कंपनीसाठीचा हा विशेष फिल्म फेस्टिवल ४ मे पासून ११ वाजता फक्त झी टॉकीजवर…

झी टॉकीजवर बच्चेकंपनींसाठी खास चित्रपट महोत्सव

रोज सकाळी ११ वाजता चिमुरड्यांसाठी खास चित्रपट

नाळ, एलिझाबेथ एकादशी यांसारख्या दर्जेदार चित्रपटांचा समावेश

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here