विषाणूत होणाऱ्या या बदलाचा अभ्यास करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) आणि ईंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) सुक्ष्म जीवशास्त्र विभाग आणि विषाणू प्रयोगशाळेने गेल्या काही दिवसांपासून ७४ नमुने नवि दिल्लीतील व्हिआरडिएल प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल व्हिआरडिएल प्रयोगशाळेने मेयोला पाठवला आहे. त्यापैकी ३५ नमुन्यांमध्ये विषाणूचे म्यूटेशन झाल्याचे आढळले.
क्लिक करा आणि वाचा-
विषाणूच्या रचनेत झालेल्या या बदलापैकी पाच नविन प्रकार आढळले. विषाणूच्या रचनेत झालेल्या या २६ नमुन्यांनमध्ये दुहेरी बदल झाल्याचेही नवी दिल्लीच्या प्रयोगशाळेने स्पष्ट केले आहे. या विषाणूच्या रचनेत झालेला हा जनुकीय बदल जुन्या रोगप्रतिकार शक्ती ला जुमानत नाही हे ही प्रयोगशाळेचे मोयोला पाठविलेल्या निरिक्षणात स्पष्ट केले आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times