नागपूर: कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर नागरिकांनी तुफान केली. ही खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास रामेश्वरीनजिकच्या टोली येथे घडली. या घटनेने पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे ४०० पोलिसांचा ताफा टोलीत पोहोचला आहे. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे. (civilians attacked police stoned hard in )
मिळालेल्या माहितीनुसार, टोलीत अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अजनी पोलिसांचे पथक कारवाईसाठी तेथे वाहनाने पोहोचले. पोलिसांचे वाहन बघताच परिसरातील महिला व नागरिकांनी पोलिसांना घेराव घातला. पोलिसांच्या वाहनांवर तुफान दगडफेक केली. जीव वाचविण्यासाठी वाहन तेथेच सोडून पोलिस निघून गेले. या घटनेचे वृत्त व छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले.
क्लिक करा आणि वाचा-
या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकारी व सुमारे ४०० पेक्षा अधिक पोलिसांनी परिसराला घेराव घातला. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांची धरपकड सुरू केली. या घटनेने या परिसरात तणावाचे वातावरण आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times