नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सच्या संपूर्ण संघाला क्वारंटाइनमध्ये राहण्याचे आदेश आता बीसीसीआयने दिले आहेत. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सच्या संघालाही क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण यामागचे आता मोठे साकरणही समोर आले आहे.

कोलकाता नाइट रायडर्सचा अखेरचा सामना हा दिल्ली कॅपिटल्सबरोबर खेळवला गेला होता. त्याचबरोबर गेल्या सामन्यात वरुण चक्रवर्तीही खेळला होता, ज्याला आज करोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे दिल्लीच्या संपूर्ण संघाला आता क्वारंटाइन व्हावे लागेल, असा आदेश बीसीसीआयने दिला आहे. दिल्लीच्या संघाचा क्वारंटाइनचा कालावधी नेमका किती दिवसांचा असेल, हे मात्र अद्याप सांगण्यात आलेले नाही.

मुंबई इंडियन्स आपला अखेरचा सामना हा चेन्नई सुपर किंग्सबरोबर खेळली होती. आता चेन्नईच्या संघातील गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी हे करोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. ज्या नियमानुसार दिल्लीच्या संपूर्ण संघाला क्वारंटाइन व्हायला सांगितले आहे, तसाच आदेश बीसीसीआय मुंबई इंडियन्सच्या संघाला आता देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कारण जर दिल्लीचा संघ केकेआरबरोबर सामना खेळल्यावर क्वारंटाइन होऊ शकतो, तर कदाचित हाच नियम मुंबई इंडियन्सला देखील लागू पडू शकतो.

मुंबई इंडियन्सचा उद्या सामना सनरायझर्स हैदराबादबरोबर होणार आहे. पण आतापर्यंत मुंबई इंडियन्सचा संघ क्वारंटाइनमध्ये राहणार की उद्याचा सामना खेळणार, याबाबतची स्पष्ट भूमिका कोणीही घेतलेली पाहायला मिळालेली नाही. कारण आतापर्यंत बीसीसीआयने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सच्या संघानेही कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे अजूनपर्यंत मुंबई इंडियन्सचा संघ क्वारंटाइनमध्ये राहणार की नाही, याबाबतचा निर्णय सर्वांसमोर आलेला नाही. त्यामुळे याबाबतचा नेमका काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. पण जर मुंबई इंडियन्सचा संघ क्वारंटाइनमध्ये गेला तर उद्याचा सामना होऊ शकणार नाही आणि सलग दुसऱ्या दिवशी आयपीएलची लढत रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयला घ्यावा लागेल. त्यामुळे याबाबत नेमकी काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here