म. टा. प्रतिनिधी,

औंध परिसरातील सिंध सोसासयटीच्या बंगल्यात घुसून ज्येष्ठ दाम्पत्याला लुटणाऱ्या टोळीला अटक केली आहे. या दाम्प्त्याकडे नर्सिंग ब्युरोमार्फत पूर्वी केअर टेकर म्हणून काम करणाऱ्यानेच हाच सर्व कट रचून लुटल्याचे समोर आले आहे. या टोळीने पूर्वी बाणेर येथे दाम्पत्याला अशा पद्धतीने लुटल्याचे समोर आले आहे. ( who robbed a couple in )

संदीप भगवान हांडे (वय २५, रा. पिंपळखेडा, ता. गंगापूर, औरंगाबाद), मंगेश बंडू गुंडे (वय २०, रा. वडीकाळ्या, ता. अंबड), राहूल कौलास बावणे (वय २२, रा. पीर कल्याण सीड, जालना), विक्रम दीपक थापा उर्फ बिके (वय १९, रा. नाशिक), भोलेश उर्फ कृष्णा किसन चव्हाण (वय २५) आणि किशोर कल्याण चनघटे (वय २१, दोघेही रा पिंपरखेडा, ता. गंगापूर, औरंगाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील मुख्य सुत्रधार हांडे असून त्याने गुंडे व बावणे यांच्या मदतीने सिंध सोसायटीतील दाम्पत्याला लुटले आहे. तर काही महिन्यापूर्वी त्यांनी बाणेर परिसरात या सर्व आरोपींनी एका ज्येष्ठ दाम्पत्याला लुटल्याचे समोर आल आहे. या आरोपींकडून १७ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली.

सिंध सोसायटीतील उच्चाभ्रू बंगल्यात २५ एप्रिल रोजी तीन व्यक्ती मागील दरवाजाने घुसले. त्यांनी दाम्पत्य व कुकला चाकूचा धाक दाखवून १५ लाख ८० हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला होता. यावेळी दाम्पत्याला बाथरूममध्ये कोंडून पसार झाले होते. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, दादा गायकवाड यांनी दोन पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. त्यावेळी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींची माहिती मिळाली. पोलिस उपनिरीक्षक महेश भोसले, मोहन जाधव, कर्मचारी दिनेश गडाकुंश, श्रीकांत वाघवले, प्रकाश आव्हाड, सुधाकर माने यांच्या पथकाने औरंगाबाग, जालना, नाशिक येथे जाऊन आरोपींना पकडले. त्यावेळी या गुन्ह्यांचा मुख्य सुत्रधार ता हांडे असल्याचे समोर आले.

क्लिक करा आणि वाचा-
एका नर्सिंग ब्युरोच्या माध्यमातून हांडे हा ज्येष्ठ दामप्त्याकडे कामाला होता. त्यामुळे त्याला बंगल्याची सर्व माहिती होती. तसेच, त्याने त्यांच्याकडे असताना पेटीएमच्या माध्यमातून ज्येष्ठ दाम्पत्यांचे पैसे स्वतःकाढून फसवणूक केली होती. या गुन्ह्यात त्याला पूर्वी अटक केली होती. त्याला पकडल्यानंतर पाषाण परिसरात ज्येष्ठ दाम्त्याला हांडे याने टोळी करून लुटल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडे देखील हांडे याने काही दिवस काम केल्याचे समोर आले आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here