वाचा:
मुंबईवरील करोनाचा विळखा सैल होत आहे. शहरात सातत्याने नवीन बाधितांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. आज पालिका क्षेत्रात २ हजार ६६२ नवीन बाधितांची भर पडली आहे तर त्याचवेळी ५ हजार ७४६ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात ७८ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार आज एकूण २३ हजार ५४२ चाचण्या घेण्यात आल्या.
वाचा:
मुंबईतील करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी होत आहे. आजच्या नोंदीनुसार हा आकडा सध्या ५४ हजार १४३ इतका आहे. रुग्णवाढीला ब्रेक लागल्याने व दररोज करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढत असल्याने चांगले संकेत मिळत आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८९ टक्के झाले आहे तर रुग्णवाढीचा दर ०.६१ टक्के इतका खाली आला असून रुग्ण दुपटीचा कालावधी १११ दिवसांवर गेला आहे.
दरम्यान, मुंबईतील झोपडपट्टी आणि चाळींमध्ये सध्या ९३ सक्रिय असून ८१४ इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times