: करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सांगलीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातही संपूर्ण लॉकडाऊनचा ( in ) निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात वाढणारी करोना रूग्णसंख्या त्याप्रमाणात प्राणवायू आणि रेमडेसिवीरची भासणारी कमतरता पाहता आज सकाळी 10 वाजता दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

‘जिल्ह्यामध्ये सद्धा ऑक्सिजनची गरज वाढत चालली आहे. रूग्णसंख्या आणखी वाढत राहिली तर ऑक्सिजनची अधिक गरज लागेल. वाढती रूग्णसंख्येची साखळी तोडण्यासाठी उद्या (५ मे) 11 वाजल्यापासून जिल्ह्यात कडकडीत करावा,’ अशा सूचना सतेज पाटील यांच्याकडून देण्यात आल्या.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयानेही लॉकडाऊनचा पर्याय सुचवला आहे. रूग्णसंख्या थांबविण्यासाठी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे. पोलिसांनी त्याची अंमलबजावणी करावी.

जिल्हाधिकारी नेमकं काय म्हणाले?
‘गेले दोन दिवस रूग्णसंख्येत वाढ कमी असली तरी पॉझिटिव्हिटीचा दर कमी नाही. जिल्ह्यातील २४०० रूग्ण ऑक्सिजनवर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सांगली, सिंधुदुर्ग, निपाणी, बेळगाव भागातील ऑक्सिजन जिल्हयातून पुरवला जात आहे,’ असं म्हणत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यातील भीषण वास्तवाबाबत माहिती दिली आहे.

या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दौलत देसाई, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके उपस्थित होते. तसंच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे दूरदृश्यप्रणालीव्दारे बैठकीत सहभागी झाले होते.

दरम्यान, सांगली जिल्ह्यातही संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. बुधवार दि. ५ मे रोजी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावला जाईल, असं पालकमंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here