वाचा:
पातुर रोडवर स्विफ्ट गाडीमध्ये क्रमांक MH ०४ DN ४२६ यामध्ये पाच जण होते. त्यात एका महिलेचाही समावेश होता. त्यांचे वागणे संशयास्पद वाटल्यानं पोलिसांनी त्यांना हटकले आणि विचारपूस केली. ते उडवाउडवीची उत्तरं देऊ लागले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. या पाचही जणांकडून एका वाहनासह मर्क्युरी ऑक्साइडच्या तीन बॉटल, एक बॉटल अॅसिड, एक चाकू, एक दोरखंड, मिरची पावडर, पाच मोबाइल असा सुमारे तीन लाख रुपये किंमतीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. हे पाचही जण मोठ्या दरोड्याच्या तयारीत होते.
वाचा:
विलास प्रकाश काले (वय ३९), कैलास धुंदन पवार (वय ६०), विजय कैलास पवार, सूरज विजू पवार, (वय २०), शीतल विलास भोसले (वय ३८) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर बुलडाणा, मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद येथे फसवणुकीचे व अन्य प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले आहे. आरोपींकडे प्राणघातक, विषारी व ज्वलनशील मर्क्युरी ऑक्सआइड कोठून आले याचा तपास पोलीस करत आहेत. त्यांच्याविरुद्ध भादविच्या ३९९, ४०२ कलमान्वये जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times