मुंबई: राज्यात नव्या बाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट होत असून कालच्या तुलनेत आज आढळलेल्या नव्या रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाली आहे. आज प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ५१ हजार ८८० नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर आज एकूण ६५ हजार ९३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यात दिलासा म्हणजे आज नव्या रुग्णसंख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. काल ही संख्या ५९ हजार ५०० इतकी होती. तसेच काल निदान झालेल्या रुग्णांची संख्या ४८ हजार ६२१ इतकी होती.कालच्या तुलनेत नव्या रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाली असून असून हा फरक ३ हजार २५९ इतका आहे. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६ लाख ४१ हजार ९१० वर जाऊन पोहचली आहे. (maharashtra registered 51880 new cases in a day with 65934 patients recovered and 891 deaths today)

आज राज्यात एकूण ८९१ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ५६७ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आज ६५ हजार ९३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ४१ लाख ०७ हजार ०९२ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.१६ टक्क्यांवर पोहोचले आहे.

पुण्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ लाख ४१ हजार ९१० इतकी झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सक्रिय रुग्णांचा विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात एकूण १ लाख ०९ हजार ५३१ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ५६ हजार ४६५ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ४५ हजार ५१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ६४ हजार ५५४ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ४५ हजार ६०५ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा-
या बरोबरच अहमदनगरमध्ये २० हजार ६५७ इतकी आहे. औरंगाबादमध्ये १२ हजार २०७, नांदेडमध्ये ही संख्या ७ हजार ८७८ इतकी आहे. जळगावमध्ये १२ हजार ५५६, तसेच तर रायगडमध्ये एकूण ११ हजार ५९० इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या ७ हजार ८२९, तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ११ हजार ९६१ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या हिंगोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ३४७ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा-

३९,३६,३२३ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ८१ लाख ०५ हजार ३८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४८ लाख २२ हजार ९०२ (१७.१६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९ लाख ३६ हजार ३२३ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ३० हजार ३५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here