अकोला: जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मुंडगांव येथील सधन शेतकरी रामदास मोतीराम थारकर याची मुलगी (सदार) हिने वयाच्या ३५ व्या वर्षी कॅन्सर या रोगावर संशोधन केले आहे. कर्करोगाच्या औषधोपचारादरम्यान निरोगी पेशी कशा प्रकारे वाचवता येतील यावर प्रियंका यांनी संशोधन केले आहे. या विषयात प्रियंका यांना ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनी येथील विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली. या यशामुळे प्रियंका यांचे अकोला तालुक्यात कौतुक होत आहे. ( in did in )

प्रियंका थारकर (सदार) यांचे एमफार्मपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्या अकोला येथीस महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम करू लागल्या. त्यानंतर लग्न होऊन काही दिवसांनी त्या न्यूझीलंड येथे गेल्या. तेथे सन २०१२ मध्ये न्युझीलंड येथील ऑकलंड विद्यापीठात त्यांनी संशोधनाला सुरुवात केली. सन २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनी येथे त्यांनी पीएचडी केली. त्यानंतर सरकारने त्यांना स्कुल ऑफ फार्मसीची स्कॉलरशीप दिली. तसेच सिडनी येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत निमंत्रित गेस्ट स्पीकर म्हणून त्यांना पाचारण करण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा-
प्रियंका थारकर यांचा संशोधनाचा विषय कर्करोगाशी संबंधित आहे. विशेष म्हणजे प्रियंकांनी यावर संशोधन करुन कर्करोगात निरोगीपेशी कशा प्रकारे वाचवता येतील यावर संशोधन केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here