‘आजचा निकाल निराशाजनक असून महाराष्ट्रावर अन्याय करणारा हा निकाल आहे,’ असं म्हणत अशोक चव्हाण यांनी कोर्टाच्या या निर्णयाविषयी आपली नाराजी व्यक्त केली.
‘सर्व संवैधानिक प्रक्रिया पार पडली होती. आमची भूमिका पहिल्यापासून मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ होती. सुप्रीम कोर्टात सर्व वकिलांनी ताकदीने बाजू मांडली. आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनेक बैठका घेतल्या होत्या. मात्र कोर्टाने राज्य सरकारने केलेला कायदा रद्द केला,’ असंही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप
‘मराठा आरक्षणाचा लढा अजून संपलेला नाही. मराठा समाजाला आरक्षण देणं अपवादात्मक का आहे, याबाबतचा अहवाल आम्ही पुन्हा केंद्राकडे पाठवू. देवेंद्र फडणवीस यांनी याआधी सभागृहाची दिशाभूल केली. त्यांनी आता लोकांना भडकवू नये, लोकांची दिशाभूल करू नये,’ अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
अशोक चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे :
– मराठा आरक्षणावरून राजकारण करू नका़
– आरक्षणप्रश्नी समन्वयाचा अभाव कधीच नव्हता
– सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अधिकृत प्रत अद्याप आलेली नाही.
– राज्याच्या विधीमंडळात हा कायदा एकमताने पारित झाला होता.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times