नागपूर: सर्वोच्च न्यायालयाने करण्याचा निर्णय दिल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यातील विरोधी पक्षांचे नेते आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे. महाविकास आघाडीच्या भूमिकेमुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं नसल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनी केली. त्यावर अल्पसंख्याक मंत्री यांनी उत्तर देत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं. देवेंद्र फडणवीस खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप मलिक यांनी केला. त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी मलिक यांच्यावर पलटवार केला. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील काही याचिका या ‘एनसीपी स्पॉन्सर्ड’ असल्याचा खळबळजनक आरोप फडणवीस यांनी केला आहे. (some petitions opposing are ncp sponsored allegation of )

फडणवीस म्हणाले की, ‘खरं म्हणजे मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही दाखल झालेल्या याचिका या एनसीपी स्पॉन्सर्ड आहेत. मराठा आरक्षणाला विरोध करणारे तुमचे लोक आहेत. मी त्याही वेळेस सांगितलं होतं. काही लोकांची वक्तव्ये देखील आहेत आणि तुम्ही त्यांच्यासोबत बैठकाही घेतल्या आहेत. बैठका घेऊन त्यांना तुम्ही याचिका टाकायला लावलेल्या आहेत, असा थेट आरोप करतानाच नवाब मलिक यांना खोटं बोलण्याचा रोग जडला आहे, असे टीकास्त्रही फडणवीस यांनी सोडले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र

जेव्हापासून नवाब मलिक यांच्या घरातील लोकांवर एनसीबीने कारवाई केली तेव्हापासून केंद्र सरकारविरोधात आणि भाजप विरोधात बेजबाबदार वक्तव्यं करण्याचा त्यांना नाद जडला असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

‘आम्ही टिकवून दाखवलं’
या सरकारला माझी आठवण आरक्षणावर स्थगिती आल्यानंतर आली. स्थगिती यायच्या आधीच्या एकाही बैठकीला मला बोलावलेलं नाही. हे सरकार विरोधकांशी चर्चा करणं कमीपणाचं मानतं. करोना असो की मग मराठा आरक्षण असो, ज्या वेळेस स्थगिती मिळाली आणि मग चारही बाजूंनी टीका झाली त्यानंतर सरकारने मला चर्चेला बोलावलं. पण मला चर्चेला बोलवा अथवा बोलवू नका. हा माझ्या सन्मानाचा विषय नाही. मराठा आरक्षण टिकलं पाहिजे हा माझा प्रयत्न होता आणि आमच्या सरकारने उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवून दाखवलं.

क्लिक करा आणि वाचा-

‘मराठा समाजातील लाभार्थींना आमच्यामुळेच संरक्षण’
९ सप्टेंबर २०२० पर्यंत ज्या लोकांनी नोकरीचा किंवा शिक्षणातील सवलतींचा फायदा घेतला आहे अशांना संरक्षण देखील मिळालेलं आहे. हे आमच्या कायद्यामुळेच मिळालेलं आहे. आम्ही कायदा टिकवला, तुम्ही तो टिकवू शकलेला नाही असे सांगतानाच खोटं बोलू नका, असं आवाहनही फडणवीस यांनी केलं आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here