नवी दिल्ली : आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यावर सर्वात जास्त समस्या येत आहे ती परेदशी खेळाडूंना. त्याचबरोबर बीसीसीआयला ही परिस्थिती हाताळणे थोडेसे कठीण जात आहे. कारण कमी वेळात त्यांना बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ हा बीसीसीआयच्या भरवश्यावर राहीलेला नसून परेदशी खेळाडूंची त्यांनी खास व्यवस्था केली आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघात बरेच परदेशी खेळाडू होते. या सर्व खेळाडूंना आपल्या मायदेशी पोहोचवण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या संघाने आता स्वत:हून मदतीचा हात पुढे केला आहे. कारण मुंबई इंडियन्सचा संघ आता परदेशी खेळाडूंना आता आपल्या खासगी चार्टड विमानांमधून मायदेशी सोडणार आहे. मुंबई इंडियन्स दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजमध्ये आपले खासगी विमान पाठवणार आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सच्या संघाने यावेळी अन्य संघाच्या मालकांसाठीही मदतीचा हात पुढे केला आहे. अन्य संघातील कोणत्या परदेशी खेळाडूला मायदेशी सोडायचे असेल तर त्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ मदत करणार आहे. मुंबईच्या संघात इंग्लंडचा एकही खेळाडू नाही, त्यामुळे ते आपले खासगी विमान इंग्लंडला पाठवणार नाही.

मुंबई इंडियन्सच्या संघात ट्रेंट बोल्ट, अॅडम मिल्ने, जेम्स नीशाम आणि शेन बाँड हे न्यूझीलंडचे खेळाडू आहेत. त्याचबरोबर अजून काही संघातील न्यूझीलंडचे खेळाडू मुंबई इंडियन्सच्या खासगी विमानामधून रवाना होणार आहेत. येत्या २४ ते ४८ तासांमध्ये ही मुंबई इंडियन्सची खासगी विमानं रवाना होणार आहेत. त्यामुळे येत्या २-३ दिवसांमध्ये परेदशी खेळाडूंना त्यांचा मायदेशात पोहोचवण्यात मुंबई इंडियन्सचा संघ यशस्वी ठरू शकणार आहे. मुंबई इंडियन्सच्या संघात क्विंटन डीकॉक आणि मार्को जेन्सन हे दोन दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आहेत. त्यांना जोहान्सबर्ग येथे पाठवण्याची व्यवस्था मुंबई इंडियन्सच्या संघाने केलेली आहे. त्याचबरोबर किरॉन पोलार्डला थेट त्रिनिदादमध्ये पाठवणयाची व्यवस्थाही यावेळी मुंबई इंडियन्सच्या संघाने केली आहे. त्याचबरोबर अजून काही वेस्ट इंडिजचे खेळाडू यावेळी मायदेशात मुंबई इंडियन्सच्या खासगी विमानाने जाऊ शकतात.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here