भोपाळ: अतिक्रमाणाची कारवाई करत असताना छिंदवाडा येथील यांचा पुतळा चुकीच्या पद्धतीने हटवल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद भोपाळमध्ये उमटले. यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ यांनी पुन्हा बसविण्याचे आदेश दिले आहेत.

छिंदवाडा येथे अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला. मात्र हा पुतळा चुकीच्या पद्धतीने हटवला गेल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्याचे पडसादही मध्य प्रदेशात उमटले. या घटनेंतर महाराष्ट्रातील नेत्यांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव आणि मंत्री सुनील केदार यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याशी संपर्क साधत हा पुतळा पुन्हा बसविण्याची विनंती केली.

‘अधिकाऱ्यांवर करणार कारवाई’

या प्रकरणात तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिली. त्यानंतर त्यांनी तातडीने हा पुतळा बसविण्याचे आदेश दिले. त्याच प्रमाणे छत्रपतींचा हा पुतळा अपमानजनक पद्धतीने कुणी हटवला, तो हटविण्याचे आदेश कुणी दिले याबाबतची चौकशी करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार या विषयाशी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here