करोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांकडून जास्त प्रमाणात वैद्यकीय बिलांची आकारणी होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्याने जिल्हा प्रशासनाने करण्यासाठी पथके नेमण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालयांनी जास्त बिलांची आकारणी करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत. (the has decided to appoint )
शहर आणि जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांकडून मोठ्या प्रमाणात वैद्यकीय बिलांची आकारणी होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. सध्या जिल्हा प्रशासन हे ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत करण्याच्या कामात गुंतले आहे. या दोन्ही गोष्टी सुरळीत होण्याच्या मार्गावर आहेत. रुग्णालयांकडून ही जास्त प्रमाणात देण्यात येत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्याने तपासणीसाठी पथके नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
क्लिक करा आणि वाचा-
करोनाच्या पहिल्या लाटेमध्येही काही रुग्णालयांकडून वैद्यकीय बिले ही जास्त देण्यात आल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर खासगी रुग्णालयांकडून देण्यात येणाऱ्या वैद्यकीय बिलांचे लेखापरीक्षण करण्यासाठी पथके नेमण्यात आली होती. त्यामध्ये उपायुक्त, सनदी लेखापाल आणि डॉक्टरांचा समावेश होता. या पथकांकडून दीड लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या बिलांचे पूर्व लेखापरीक्षण (प्री ऑडिट) करण्यात आले होते. रुग्णांना घरी सोडण्यास किंवा रुग्ण मृत्युमुखी पडल्यास मृतदेह ताब्यात मिळण्यास विलंब लागू नये, म्हणून पूर्व लेखापरीक्षण हे एक तासात करण्याचाही निर्णय घेण्यात आला होता.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times