करोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा आता पुरेसा साठा उपलब्ध होऊ लागला असून, बुधवारी नऊ हजार ७५६ इंजेक्शनचे वितरण ५५७ खासगी रुग्णालयांना करण्यात आले. आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार आवश्यकता असलेल्याच रुग्णांसाठी या इंजेक्शनचा वापर करावा; तसेच रुग्णालयांनी रुग्णांच्या नातेवाइकांना या इंजेक्शनसाठी प्रिस्क्रिप्शन लिहून देऊ नये, अशा सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिल्या आहेत. (the has instructed that the should not be given prescription for )
जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना गेल्या दोन दिवसांत मागणीच्या तुलनेत इंजेक्शनचा साठा उपलब्ध होऊ लागला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागातील रुग्णांसाठी मंगळवारी १२ हजार ५१, तर बुधवारी नऊ हजार ७५६ इंजेक्शनचे वितरण करण्यात आले.
क्लिक करा आणि वाचा-
‘रुग्णालयांनी प्रिस्क्रिप्शन लिहून देऊ नये’
जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे वितरण हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रणाखाली होत आहे. त्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख हे समन्वयक म्हणून काम पाहात आहेत. अनेक रुग्णालयांकडून हे इंजेक्शन बाहेरून आणण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना प्रिस्क्रिप्शन लिहून देण्यात येते. याबाबत देशमुख म्हणाले, ‘आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठीच या इंजेक्शनचा वापर करावा. रुग्णालयांनी रुग्णांच्या नातेवाइकांना या इंजेक्शनसाठी प्रिस्क्रिप्शन लिहून देऊ नये‘
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times