नवी दिल्लीः नॅशनल सिक्युरीटी गार्डमध्ये (NSG) करोनाने पहिला बळी घेतला आहे. दिल्लीतील चे ग्रुप कमांडर बीरेंद्र कुमार झा यांनी करोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला. त्यांना वेळेवर आयसीयू बेड मिळाला नाही. यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असं मीडिया रिपोर्ट्समधून सांगण्यात आलं. बीरेंद्र २२ एप्रिलला पॉझिटिव्ह आढळून आले होते. यानंतर त्यांना नोएडातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांची प्रकृती बरी होती. पण ४ मे रोजी अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांची ऑक्सिजन लेवल खूप खाली आली.

१९९३ मध्ये बीएसएफ जॉइन

NSG च्या सोशल मीडिया अकाउंटवरून माहिती देण्यात आली. बीरेंद्र कुमार यांनी १९९३ मध्ये बीएसएफ जॉइन केली होती. ५३ वर्षांचे बीरेंद्र हे बिहारचे रहिवासी होते. बीएसएफमधून २०१८ मध्ये ते प्रतिनियुक्तीवर NSG मध्ये सहभागी झाली. आतापर्यंत NSG मध्ये करोना संसर्गाचे ४३० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ५९ जणांवर उपचार सुरू आहे.

दिल्लीतील स्थिती गंभीर

राजधानी दिल्लीत मंगळवारी करोनाचे १९,९५३ नवीन रुग्ण आढळून आले. तिथे आता जवळपास ९२ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजूबाजूची शहरं नोएडा आणि गुरुग्राममध्येही करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हॉस्पिटल्सचे बेड आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे मृतांची संख्या वाढत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here