मुंबई: हिंदी आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलेल्या अभिनेत्री यांचं ५ मे ला करोना व्हायरसच्या संक्रमणानं निधन झालं आहे. मागच्या काही दिवसांत करोना व्हायरसमुळे बॉलिवूडनं अनेक कलाकार गमावले आहेत अशात आता श्रीपदा यांच्या निधनानं बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. CINTAA चे जनरल सेक्रेटरी अमित बहल यांनी श्रीपदा यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला.

श्रीपदा यांच्या निधनाच्या वृत्ताची पुष्टी करताना अमित बहल म्हणाले, ‘करोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत आपण अनेक चांगले कलाकार गमावले आहेत. सोशल मीडियावर ज्या ज्या लोकांच्या निधनाबद्दल बोललं जात आहे. त्याबद्दल पुन्हा बोलण्याची गरज नाही. पण श्रीपदा आमच्या फ्रॅटरनिटीच्या वरिष्ठ सदस्या होत्या.’

श्रीपदा यांनी चित्रपटसृष्टीत बरेच वर्ष काम केलं. ज्याचं खूप कौतुकही झालं. जवळपास ६८ चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या श्रीपदा यांच्याबद्दल बोलताना अमित बहल म्हणाले, ‘त्यांनी साऊथ सोबतच हिंदी चित्रपटांमध्येही उत्तम अभिनय केला होता. आपण एक उत्तम अभिनेत्री गमावली हे आपलं दुर्दैव आहे. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. यासोबतच मी प्रार्थना करतो की, या व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत आणखी लोकांचा मृत्यू होऊ नये.’

श्रीपदा भोजपुरी सुपरस्‍टार रवि किशन यांच्यासोबत २०१५ मध्ये ‘हम तो हो गई नी तोहार’ या चित्रपटात दिसल्या होत्या. श्रीपदा यांच्या निधनानंतर रवि किशन यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. ते म्हणले, ‘हे खूपच दुःखद आहे. त्या माझ्या सह-कलाकार होत्या. त्यांचा स्वभाव खूपच चांगला होता आणि विशेष म्हणजे त्या खूपच विनम्र होत्या. देव त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून बाहेर पडण्याची ताकद देवो.’

श्रीपदा यांनी १९७८ मध्ये त्यांच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. त्या ‘पुराना पुरुष’, विनोद खन्‍ना स्‍टारर ‘धर्म संकट’ यासारख्या चित्रपटांध्ये दिसल्या होत्या. याशिवाय त्यांनी ‘बेवफा सनम’ आणि ‘आजमाइश’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं होतं. तसेच श्रीपदा यांनी १९९३ मध्ये एका टीव्ही शोमध्येही पाहुणे म्हणून हजेरी लावली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here