मुंबई: अँटिलियासमोर सापडलेल्या स्फोटकांचं प्रकरण ताजं असतानाच आता अणुबॉम्बसाठी वापरल्या जाणाऱ्या युरेनियमचा मोठा साठा मुंबईत जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र एटीएसनं ही कारवाई केली असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
जिगर पांड्या आणि अबू ताहिर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. या दोघांनाही १२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात युरेनियम कशासाठी आणले गेले होते, याचा तपास एटीएसकडून तपास सुरू करण्यात आला आहे. युरेनियमचा साठा तपासणीसाठी भाभा अणुशक्ती केंद्रात पाठविण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या युरेनियमची किंमत तब्बल २१ कोटी आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times