वाचा:
करोनाशी झुंज देत गेल्या वर्षभरात उपराजधानीतील मेडिकल, मेयो आणि डागा आणि मनपाच्या रुग्णालयांत एक दोन नव्हे तर ११०० हून अधिक विषाणू बाधित गर्भवती स्त्रियांनी बाळाला जन्म दिला. उपराजधानीत १२ मार्च २०२० ला पहिला करोनाबाधित रुग्ण आढळला होता. तेव्हापासून आजवर सर्वाधिक ५७५ करोनाग्रस्त मातांची बाळंतपणे करण्याचे आव्हान एकट्या मेडिकलच्या स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र विभागाने उचलले आहे. तर मेयोच्या स्त्री रोग प्रसूतीशास्त्र विभागानेही या काळात प्रसव कळांमुळे अवघडलेल्या ४४८, डागाने ३८ तर मनपाने १६ करोनाबाधित गरोदर मातांची बाळंतपणे केली. तर, करोनाच्या गुंतागुतीमुळं ३५ गर्भवती महिलांना प्राण गमवावे लागले आहेत.
वाचा:
करोना विषाणूच्या विळख्यात अडकलेल्या गरोदर स्त्रियांची प्रसूती शल्यक्रिया करताना संपर्कात आल्याने या रुग्णालयांमधील अनेक डॉक्टर, नर्सेस करोनाबाधित झाले. मात्र त्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता प्रसव कळा सोसणाऱ्या गर्भवती स्त्रियांची बाळंतपणे केली. आजही ही रुग्ण सेवा सुरू आहे.
रुग्णालय | एकूण बाळंतपणे | करोना बाधित माता |
मेयो | ४५०० | ४४८ |
मेडिकल | १५०८० | ५७५ |
डागा रुग्णालय | ९०९० | ३८ |
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times