कराची: साधारणपणे एखाद्या प्रकरणात ज्याची चूक असते तो पोलिसांकडे मदत मागत नाही. मात्र, कराचीतील या घटनेत एका व्यक्तीला पोलिसांची मदत घ्यावी लागली. त्याला कारणही तसेच होते. या व्यक्तीने आपल्या तिसऱ्या लग्नाचा घाट घालत मांडवात आला खरा पण पहिल्या बायकोने त्याचे तिसरे लग्न उधळून लावले. ज्या लग्नात तिसऱ्या लग्नाचा बार उडवणार होता तिथं त्याला पहिल्या बायकोने जबरदस्त मारहाण केली.

पाकिस्तानमधील वृत्तपत्र द एक्सप्रेस ट्रिब्युनने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी रात्री, मदिहा आणि नातेवाईक कराचीमध्ये आसिफ रफीकच्या लग्नात दाखल झाले. मदीहा आणि आसिफचा विवाह २०१४ मध्ये झाला होता. रफिकने जिन्ना विद्यापीठातील एका महिलेसोबत दुसरा विवाह केला होता. याबाबत त्याने पहिल्या पत्नीला काहीही माहिती दिली नाही. ज्यावेळी पहिल्या पत्नीला ही बाब समजली तेव्हा त्याने माफी मागितली आणि आयुष्यभरसोबत राहण्याचा शब्द दिला. मात्र, रफिकने तिसऱ्या लग्नाचा घाट घातला. पहिली पत्नी मदिहाने नातवाईकासह या लग्नात शिरून रफीकला मारहाण करत त्याचे कपडे फाडले. जीव वाचवण्यासाठी रफिकने पोलिसांकडे धाव घेतली.

वाचा:

वाचा:

पोलिसांनी रफिकला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यातही मारहाण केली. पोलीस स्टेशनमधून पळ काढण्याचा प्रयत्न करत एका बसखाली लपण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. रफिकच्या दाव्यानुसार, त्याने पहिली पत्नी मदिहाला घटस्फोट दिला होता. त्यामुळे पहिल्या पत्नीसोबत सल्लामसलत करण्याचा काही संबंधच नव्हता. त्याशिवाय एकाच वेळी चार लग्न करण्याचा आपला अधिकार आहे, असाही दावा त्याने केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

6 COMMENTS

  1. Ah yes, this is exactly the article I was looking for. I’ve been looking for the information you provided for days. I wish you continued success

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here