करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी येत्या शनिवारपासून कडक लावण्याचा निर्णय बदलापूर नगरपरिषदेनं घेतला आहे. आमदार किसन कथोरे यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. शहरात सात दिवसांसाठी हा लॉकडाऊन असणार आहे.
लॉकडाऊन काळात कोणते निर्बंध असणार?
करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या या लॉकडाऊनमध्ये नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात येणार आहेत. शहरातील नागरिकांना अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त घराबाहेर पडता येणार नाही. तसंच अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकानेच या काळात सुरू राहतील. निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
अनेक जिल्ह्यांतही संपूर्ण लॉकडाऊन
करोनाच्या दुसऱ्या लाटेने धडक देऊन अनेक दिवस लोटल्यानंतरही आरोग्य व्यवस्थेची स्थिती सुधारलेली नाही. त्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह अन्य काही ठिकाणीही कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times