वाचा:
मुंबई महापालिकेचे अथक प्रयत्न आणि त्याला मिळत असलेली मुंबईकरांची साथ यामुळे करोना संसर्गावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता आले आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा वेग मंदावला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. रुग्णालयांतील स्थितीही सध्या नियंत्रणात आलेली आहे. एप्रिल महिन्यात एकवेळ मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या ११ हजारांपर्यंत पोहचली होती. बहुतांश रुग्णालये रुग्णांनी व्यापली होती. या स्थितीचा पालिकेने अत्यंत नियोजनबद्धपणे मुकाबला केला असून करोनाचे आकडे वेगाने खाली येताना दिसत आहेत.
वाचा:
मुंबईत आज ३ हजार ५६ नवीन रुग्णांची भर पडली तर ३ हजार ८३८ रुग्ण करोनामुक्त झाले. आज एकूण ३० हजार ९४२ चाचण्या करण्यात आल्या असून सध्या ५० हजार ६०६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत मुंबईत ६९ मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत करोनाच्या विळख्यात सापडलेल्या १३ हजार ६१६ जणांना प्राणास मुकावे लागले आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आता १३० दिवसांवर गेला आहे. रुग्णवाढीचा दर ०.५१ टक्के आहे तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर पोहचलं आहे. झोपडपट्टी विभाग आणि चाळींमध्ये सध्या ९६ सक्रिय आहेत तर ५ पेक्षा अधिक रुग्ण सापडलेल्या ६४५ इमारती सील करण्यात आल्या आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times