म. टा. प्रतिनिधी, जळगाव

वर्षभरापासून रस्त्यावर उतरुन करोनाशी दोन हात करणाऱ्या जिल्हा पोलिस दलातील आठ पोलिस कर्मचाऱ्यांचा करोनाने बळी घेतला आहे. वर्षभरात ६६१ पोलिस कर्मचारी करोना बाधित झाले होते. आतापर्यंत ९० टक्के पोलिस कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला तर ६५ टक्के कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला असल्याची माहिती पोलिस दलाकडून देण्यात आली आहे. ( in )

करोना संसर्गाला सुरुवात झाल्यानतंर मार्च २०२० पासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. तेव्हापासून पोलिस कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. आतापर्यंत १ हजार ७५६ पोलिसांची करोना चाचणी करण्यात आली आहे. त्यातील १ हजार ९५ कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटीव्ह आले. तर ६६१ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली. रस्त्यावर कर्तव्य बजावत असताना गेल्या वर्षभरात आठ कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू झाला आहे. यातील सहा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासन आदेशानुसार प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. तर दोन कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव अद्याप प्रलंबीत आहेत.

सध्या कोव्हॅक्सीन व कोविशिल्ड या लसी उपलब्ध झाल्यापासून फ्रंट लाईन वर्कर्सच्या कोट्यातून पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. यात जिल्हा पोलिस दलातील सुमारे ३२०० पैकी ३ हजार पोलिस कर्मचाऱ्यांनी पहिली लस घेतली आहे. तर २५०० कर्मचाऱ्यांनी दोन्ही लस घेऊन आता ते कर्तव्य बजावत आहेत. पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी जिल्हा रुग्णालयाकडे पाठपुरावा करुन पोलिस व त्यांच्या कुटुंबीयांना मल्टीपर्पज हॉल येथे लसीकरण उपलब्ध करुन दिले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
वर्षभरापासून करोनाशी लढणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावर भर दिला आहे. आत्तापर्यंत ९० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पुर्ण झाले आहे. उर्वरीत कर्मचाऱ्यांचे लसीकरणही लवकरच पुर्ण करण्यात येणार असल्याची माहीती देखील पोलिस दलाकडून देण्यात आली आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here