यवतमाळ: कुटुंबीयांनी लग्न पक्के केल्यानंतर नियोजित वरावर त्याच्या होणाऱ्या वधूने लग्नाच्या ४ दिवस आधी शीतपेयातून विषप्रयोग केला. यवतमाळच्या येथे घडलेल्या या धक्कादायक प्रकाराची कबुली विषप्रयोग करणाऱ्या तरुणीने दिली आहे. विशेष म्हणजे ज्याठिकाणी विषप्रयोग करण्यात आला तेथील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे. या तरुणीचे आठ वर्षांपासून दुसऱ्या एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. मात्र कुटुंबीयांनी मनाविरुद्ध लग्र ठरवून दिल्याने होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढण्याचा प्लान तरुणी व तिच्या प्रियकराने आखला होता. ( )

वाचा:

प्रियकराने ही आयडिया सुचविली आणि त्यानंतर होणाऱ्या नवऱ्याला विष टाकलेले पेय सेवन करण्यासाठी मी शपथ घातली, असे तरुणीने कबूल केले. त्याआधारे पोलिसांनी तिला व तिच्या प्रियकराला अटक केली आहे. विषप्रयोगानंतर नियोजित वराची प्रकृती चिंताजनक झाली होती. ठरलेले लग्न देखील स्थगित करण्यात आले होते. दरम्यान, आपल्यावर विषप्रयोग झाल्याची तक्रार तरुणाने केल्यानंतर पोलिसांच्या तपासात सारा प्रकार पुढे आला.

वाचा:

जांभुळणी ( ता. ) येथील या युवकाचा विवाह कोव्हळा (ता. नेर) येथील तरुणीशी जुळला होता. १९ एप्रिल रोजी हे दोघे विवाह बंधनात अडकणार होते. मात्र, तरुणीचे दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधात अडसर ठरणारा नियोजित वर किशोरचे तिच्याशी लग्न होऊ नये, यासाठी प्रेमी युगुलाने प्लान आखला. १५ एप्रिल रोजी तिने किशोरला नेर येथे एका कोल्डिंक्स हाऊसमध्ये बोलाविले. यावेळी तिची लहान बहीण आणि दोन भाऊ सोबत होते. याठिकाणी किशोरकडे तीन हजार रुपयांची तिने मागणी केली. किशोरने ही रक्कम दिली. त्याचवेळी तिने किशोरसाठी थंडपेय ऑर्डर केले. त्यानंतर किशोरच्या नकळत तिने शीतपेयामध्ये विषारी द्रव टाकले व शपथ घालत तिने किशोरकडे विष मिसळलेले पेय पिण्याचा आग्रह केला. शीतपेय पिताच किशोरला मळमळ सुरू झाली. त्याच वेळी किशोरची होणारी पत्नी व तिचे भाऊ दुचाकीने निघून गेले. किशोर आपल्या मित्रासोबत कोव्हळा येथे जात असताना चक्कर येऊन खाली कोसळला. त्याला तातडीने नेर व नंतर येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. यावेळी त्याला विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले. १३ दिवसांनी प्रकृती ठीक झाल्यानंतर किशोरने पोलिसांत याबाबत तक्रार दिली.

वाचा:

नववधूसह बहिण भावावर गुन्हे, प्रियकराला अटक

ठरलेले लग्न होऊ नये म्हणून शीतपेयामध्ये विषारी द्रव टाकण्यास प्रियकराने सांगितले होते. नवरदेवाची तब्येत बिघडून ठरलेल्या मुहूर्तावरचे लग्न रद्द होईल. त्यानंतर आपण पळून जाऊ असे सांगून हा सर्व प्रकार मला त्याने करायला लावला, असा जबाब तरुणीने पोलिसांकडे दिला आहे. विष प्रयोगाप्रकरणी पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, हत्येचा कट रचणे या सारखे गंभीर गुन्हे तरुणी आणि तिच्या दोन भावांसह बहिणींवर दाखल केला आहे. शिवाय कट रचण्यात सहभाग असलेल्या तिच्या प्रियकराला सोनवाढोणा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी तरुणीला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here