कोल्हापूर: शहरातील महापालिकेच्या वतीने बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आल्या आहेत. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्या प्रशासक यांनी गुरुवारपासून भाजी मंडई बंद करण्याचा निर्णय घेत हे कठोर पाऊल उचलले आहे. विक्रेत्यांना घरोघरी फिरून भाजी विक्री करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ( )

वाचा:

प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या आदेशानुसार उपायुक्त रविकांत अडसूळ व उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे यांनी गुरुवारी सकाळी ७ वाजता कसबा बावडा भाजी मार्केट, धैर्यप्रसाद चौक, खानविलकर पेट्रोल पंप चौक येथील मार्केटमध्ये पाहणी केली. तसेच उपायुक्त शिल्पा दरेकर व उपशहर अभियंता नारायण भोसले यांनी कपिलतीर्थ मार्केट, लक्ष्मीपुरी भाजी मार्केट, पाडळकर मार्केट, ऋणमुक्तेश्वर मार्केट, पंचगंगा घाट भाजी मार्केट, जवाहरनगर येथील मार्केटची पाहणी केली. सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर व उपशहर अभियंता बाबूराव दबडे यांनी शाहूपुरी भाजी मार्केट, नार्वेकर मार्केट, शेंडापार्क मार्केट येथे पाहणी केली. तर उपशहर अभियंता एन. एस. पाटील यांनी टिंबर मार्केट, रामानंदरनगर पुलावजळल मंडई, रंकाळा येथील डी मार्ट, नाना पाटीलनगर चौक, सानेगुरुजी वसाहत, रायगड कॉलनी येथे मार्केटमध्ये गस्त घातली.

वाचा:

या पाहणीदरम्यान भाजी मार्केटमधील भाजी विक्रेते पुन्हा येथे बसणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले. नार्वेकर मार्केट, शाहूपुरी भाजी मार्केटसह इतर मार्केटमध्ये आवश्यकतेनुसार बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. या पाहणीचा तपशील प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना देण्यात आल्यानंतर गर्दीचा मुद्दा ऐरणीवर आला. करोनाची साखळी तोडायची असेल तर काहीही करून गर्दीला आवर घातलाच पाहिजे हे ध्यानात घेत बलकवडे यांनी कठोर निर्णय घेतला. त्यानुसार तातडीने सर्व भाजी मंडई बंद करण्यात आल्या असून विक्रेत्यांनी घरोघरी फिरून भाजी विक्री करावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन आधीच कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात कडक लॉकडाऊनचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत. मात्र, गर्दी कमी होत नसल्याने स्थानिक प्रशासन आणि पोलीस कठोर पावले टाकताना दिसत आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here