कोल्हापूर: खूनाचा प्रयत्न, बलात्कार, मारामारी, खंडणी वसुली, जाळपोळ, दरोडा, प्राणघातक हल्ला अशा विविध गुन्ह्यांत ४१ खटले दाखल असणाऱ्या आणि शहरात दहशत माजवणाऱ्या विरोधात कोल्हापूर पोलिसांनी आघाडी उघडली आहे. या गँगच्या आणि अन्य सदस्यांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे. ( )

वाचा:

शाहू टोल नाक्यावर एसटी गँगने हॉटेल व्यावसायिक सद्दाम अब्दुलसत्ता मुल्ला (रा. १३२७, कन्हैय्या सर्व्हिंसिंग सेंटरजवळ, यादवनगर) व त्यांचा मित्र साद शौकत मुजावर यांची कार अडवून त्यांच्यावर हॉकी स्टीकने हल्ला चढवून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. एसटी गँगने त्यांच्यावर पाळत ठेऊन हा हल्ला केला होता. जखमी मुल्ला यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांनी गुन्ह्याचा तपास करून साईराज दीपक जाधव, ऋषिकेश उर्फ गेंड्या बाबासो चौगुले, आसू बादशहा शेख, अर्जुन बिरसिंग ठाकूर, नितीन उर्फ बॉब दीपक गडीयाल, प्रसाद जनार्दन सूर्यवंशी, करण उदय सावंत, रोहित बजरंग साळोखे, राम मुकुंद कलकुटकी या आरोपींना अटक केली. तसेच या गुन्ह्यातील तीन अल्पवयीनांची सुधारगृहात रवानगी केली.

वाचा:

एसटी गँगच्या विरोधात यापूर्वी गंभीर गुन्हे असल्याने पोलीस अधीक्षक यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांना या गँगवर मोक्का अंतर्गत कारवाईचे आदेश दिले. एसटी गँगच्या विरोधात २०११ पासून राजारामपुरी, शाहूपुरी, करवीर, जयसिंगपूर, गोकुळ शिरगाव या पोलीस ठाण्यात ४१ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खुनाचा प्रयत्न ११ गुन्हे, खुनाच्या प्रयत्नासह जाळपोळ एक, दरोडा एक, सरकारी नोकरावर हल्ला एक, जबरी चोरी सहा, दुखापतीचे आठ, गर्दी मारामारी तीन, अल्पवयीन मुलीवर बलात्कार एक, जाळपोळ दोन, आर्म्स अॅक्ट एक, अंमली पदार्थ सेवन एक, खंडणी एक, जुगार एक, गृह अतिक्रमण एक व इतर दोन गुन्ह्याचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी मोक्का प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठविला होता. विशेष पोलिस महानिरीक्षक लोहिया यांनी मोक्का अंतर्गत वाढीव कलमांचा अंतर्गत करण्यास परवानगी देऊन कारवाईचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्याचा तपास शहर पोलिस उप अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here