: संसर्गाच्या वाढत्या आकडेवारीने सोलापूरकरांची चिंता वाढवली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात महसूल विभाग, महापालिका प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या ८ मे रोजी रात्री आठ वाजल्यापासून १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत मेडिकल, बँका, वर्तमानपत्रे अशा अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे पासधारक आहेत त्यांना दूध पिशव्या पोहचवण्याची मुभा असणार आहे. कडक बाबतचा आदेश सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज काढला आहे. हा आदेश सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी संयुक्तपणे लागू करण्यात येणार आहे. ( )

वाचा:

सोलापूर जिल्ह्यात करोना बळींची संख्या आज सलग दुसऱ्या दिवशीही म्हणजे गुरुवारीही ५० पार राहिली. ग्रामीण भागात आज ३८ तर शहर हद्दीत १५ अशा एकूण ५३ जणांचा करोना संसर्गाने मृत्यू झाला. त्याचवेळी जिल्ह्यात २ हजार ११७ नव्या करोना बाधितांची भर पडली आहे. त्यापैकी १ हजार ९३७ रुग्ण हे ग्रामीण भागातील असून उर्वरित १८० रुग्ण हे शहर परिसरात आढळले आहेत. त्यामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १८ हजार ७१९ इतकी झाली आहे. करोनाचा हा वाढता आले सर्वांचीच चिंता वाढवणारा ठरला आहे. ही भीषण स्थिती लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झाले असून कडक पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज याअनुषंगाने एक तातडीची बैठक झाली. या बैठकीला महानगर पालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, यांच्यासह पोलीस आयुक्तालय आणि अधीक्षक कार्यालय यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याबैठकीनंतर कडक निर्बंधांबाबतचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केला आहे.

वाचा:

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळेच सध्या जे निर्बंध आहेत त्यात वाढ करण्याचा निर्णय ठिकठिकाणी घेण्यात येत आहे. त्यानुसार सातारा, आणि या जिल्ह्यांत कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता सोलापुरातही प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. ८ मे रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते १५ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत नवा आदेश लागू राहणार आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here