कोलकाताः पश्चिम बंगालमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. करोनाच्या या संसर्गाला भाजप नेते जबाबदार असल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केला आहे. भाजपचं एक पथक आलं होतं आणि ते परत गेलं. पण करोनाच्या वाढत्या संसर्गात मंत्री येत असतील तर त्यांनाही विशेष उड्डाणांसाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट आणावा लागेल. करोना संबंधीचे नियम सर्वांना समान आहेत, असं म्हणाल्या.

पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्यांचे सतत दौरे होत आहेत. यामुळेच राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत करोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात कुठलीही हायगय करणार नाही. आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट असल्याशिवाय राज्यात प्रवेश दिला जाणार नाही, असं सांगत ममता बॅनर्जींनी भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला.

करोनाबाबत केंद्र सरकारची कुठलंही पारदर्शक धोरण नाहीए. पंतप्रधान मोदींना पत्र लिहून धोरण आणखी सुलभ करण्याची मागणी केली आहे. तसंच बंगलला लसीचा पुरवठा कमी होत असल्यावरूनही त्यांनी केंद्रावर टीका केली.

भाजप जनतेचा कौल स्वीकारण्यास तयार नाही

विधानसभा निवडणुकीत जनतेने तृणमूल काँग्रेसला बहुमत दिलं आहे. निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. पण भाजप जनतेने दिलेला कौल स्वीकारण्यास तयार नाही, असा आरोप ममतांनी केला आहे. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्रालयाने सरकारला पत्र लिहून राज्यातील हिंसाचार प्रकरणी सविस्तर अहवाल मागितला आहे. राज्य सरकारने अहवाल न पाठवल्यास सरकार हे प्रकरण गंभीरतेने घेईल, असं केंद्राने पत्रात म्हटलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here