नवी दिल्लीः देशात करोना संसर्गाच्या ( ) दुसऱ्या लाटेने आरोग्य यंत्रणा कोलमडण्याच्या स्थितीत ( ) आहेत. कुठे ऑक्सिजनचा तुटवडा तर कुठे औषधांचा. रुग्णांच्या नातेवाईकांचा पळापळ सुरू आहे. या सर्व दमछाक करून सोडणाऱ्या स्थितीत एक दिलासा देणारी बातमी आली आहे. करोनाच्या या दुसऱ्या लाटेपासून मुक्ती कधी मिळणार? याचं उत्तर जाणकार आणि लस तज्ज्ञ गगनदीप कांग ( ) यांनी दिलं आहे. गगनदीप कांग यांनी व्यक्त केलेल्या भाकीताने आपल्याला दिलासा मिळणार आहे. या महिन्याच्या अखेरीस करोना रुग्णांची संख्या घटताना दिसेल, असं ते म्हणाले. त्यापुढेही करोना रुग्णांच्या संख्येत एक दोन वेळा मोठी उसळी दिसून येईल. पण ती सध्याच्या स्थिती एवढी धोकादायक नसेल, असं कांग यांनी सांगितलं.

गेल्या वर्षी जिथे व्हायरस नव्हता आता तिथे तो पोहोचला

करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या मेच्या मध्यापासून कींवा अखेरीस कमी होईल. करोना रुग्णांच्या संख्येत एक किंवा दोन वेळा उसळी येईल. पण ती वर्तमान स्थितीच्या तुलनेत तेवढी धोकादायक नसेल. सध्या व्हायरसचा प्रादुर्भाव अशा भागांमध्यो होतोय जिथे गेल्या वर्षी तो पोहोचला नव्हता. करोनाचा संसर्ग सध्या ग्रामीण भागात मोठ्या वाढला आहे. हा प्रादुर्भावही कमी होईल, असं गगनदीप कांग यांनी सांगितलं.

‘लस पूर्णपणे प्रभावी, लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज’

लसींबाबत असलेली भीती आणि गैरसमज त्यांनी दूर केला. लस प्रभावी आहे आणि लसीकरण मोहीम वेगाने राबवण्याची गरज आहे. पण करोनासंबंधी होत असलेल्या चाचण्या कमी झाल्याने कांग यांनी चिंता व्यक्त केली. करोना रुग्णांची संख्या ही चाचणी होत असलेल्या आकड्यांपेक्षा अधिक आहे, असं ते म्हणाले.

विविध मॉडेल्सनुसार या महिन्याच्या मध्यपासून किंवा अखेरपासून करोना रुग्णांची संख्या कमी होईल. पण काही अंदाजानुसार जूनच्या सुरवातीपासून रुग्णसंख्या कमी होईल असं बोललं जातंय, असं कांग यांनी सांगितलं.

‘पुढे जाऊन व्हायरल इन्फेक्शन सारखा असेल करोना’

हा पुढे डाऊन मोसमानुसार होणाऱ्या सामान्य फ्लु सारखा होईल. पुढे जाऊन तो शांत होईल. नागरिकांनी सतत प्रतिकारक्षमता आणि लसीकरण केल्यास त्यांची प्रतिकारशक्ती वाढेल, असं तज्ज्ञ गगनदीप कांग यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here