मुंबई: अंधेरी पूर्वेकडील मरोळ एमआयडीसीतील एका इमारतीला भीषण आग लागली असून यात एक महिला जखमी झाली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

वाचा:

आग लागलेली इमारत रोल्टा कंपनीची आहे. तीन मजल्याच्या या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या सर्व्हर रूममध्ये साडेअकराच्या सुमारास स्पार्क झाला आणि अचानक आग लागली. संपूर्ण काचेच्या असलेल्या या इमारतीमध्ये कुठल्याही प्रकारचं व्हेंटिलेशन नसल्यानं इमारतीत धूर कोंडला गेला. उष्णता निर्माण झाल्यानं अग्निशमन दलाच्या जवानांना इमारतीत शिरून काही करता येत नव्हतं. त्यामुळं आग आटोक्यात येण्यास बराच उशीर झाला. संपूर्ण परिस्थितीचा अंदाज घेऊन जवानांनी इमारतीच्या काचा फोडून पाण्याचे फवारे मारले. शिडी लावून इमारतीच्या गच्चीवर पाण्याचा मारा केला गेला. या सगळ्या प्रयत्नांनंतर आग शमवण्यात यश आलं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here