मुंबई: लॉकडाऊनमुळं अर्थव्यवस्था संकटात असतानाही मोदी सरकार नव्या संसद भवनावर (सेंट्रल व्हिस्टा) अमाप खर्च करत असल्याची टीका झाल्यावर भाजपनं राज्यातील मनोरा आमदार निवासाच्या पुनर्विकासाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला आता काँग्रेसनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मनोराचा पुनर्विकास आणि प्रकल्पाची तुलना हास्यास्पद असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे. (Congress Leader )

वाचा:

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या संदर्भात विस्तृत ट्वीट केलं आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनंच मनोरा वसतिगृह पुनर्बाधणीचा निर्णय २०१८ मध्ये घेतला होता. त्यांच्याद्वारे नेमलेल्या ‘एनबीसीसी’ या एजन्सीने आधीची वास्तू जमीनदोस्त केली. बांधकामाला विलंब झाल्यामुळं सरकारचे ₹ ७०० कोटींपेक्षा जास्त नुकसान झालं आहे. कारण दरमहा सुमारे ₹ ३.५ कोटी आमदारांना दिले जातात. भाजप आमदारांनाही प्रत्येकी १ लाख मिळतात. म्हणजे आमदारांसाठी आजवर ₹ १५० कोटी खर्च झाले आहेत. तसंच, एनबीसीसीच्या विलंबामुळे प्रकल्पाच्या किंमतीत ₹ ५५० कोटी वाढ झाली. हे पाहून मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती यांच्या उच्चस्तरीय समितीने प्रकल्प राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्याचा निर्णय गतवर्षी घेतला व ₹८७५ कोटीची तरतूद केली. मार्च २०२१ ला काम सुरू करण्यासाठी मुदत ठेवली,’ अशी माहिती सचिन सावंत यांनी दिली आहे.

वाचा:

‘मनोरा पुनर्विकासाच्या चालू प्रक्रियेची ‘सेंट्रल व्हिस्टा’शी तुलना करणं हास्यास्पद आहे. मुळात पंतप्रधानांचे निवासस्थान, ७, लोककल्याण मार्गावर आहे. संसद व खासदारांसाठी स्वतंत्र निवासी परिसर अस्तित्वात आहे. राज्यातील परिस्थिती तशी नाही. इथं आमदार वसतिगृह तोडलं गेल्यानं ते उभारणं आवश्यक आहे, पण शहेनशहा मोदींचा चेहरा वाचवण्यासाठी भाजप बेफाम आरोप करत आहे. मनोरा दुरुस्त करता आला असता, परंतु फडणवीस सरकारच्या काळात त्यातही घोटाळा झाला,’ असं आरोप सावंत यांनी केला आहे.

‘महाविकास आघाडीच्या सरकारला करोनाच्या बाबतीत किमान भाजपकडून उपदेशाची आवश्यकता नाही. आम्ही करोनाच्या संकटात कार्यक्षमतेनं काम करत आहोत. करोना हाताळण्यापेक्षा निवडणुकीत मग्न राहणाऱ्या आणि जनतेला व राज्यांना मदत करण्याऐवजी सेंट्रल व्हिस्टात स्वतःसाठी आलीशान महाल उभारणाऱ्या मोदीजींना या उपदेशाची गरज आहे,’ असंही सावंत यांनी सुनावलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here