वाचा:
शंकर बाबाराव लडके (४५) रा. पुरड, ता. वणी असे बोगस बियाणे विक्री करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तालुक्यात दरवर्षीच खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन ही नगदी पीके अस्मानी संकटामुळे नेस्तनाबूत होतात. यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन त्यांना लाखो रुपयांचे बोगस बियाणे विकले जाते. याबाबतची माहिती मिळताच जिल्हा कृषी विभागाचे भरारी पथक, तालुका कृषी विभाग तथा शिरपूर पोलिसांच्या संयुक्तपणे कारवाई केली. या कारवाईत आरोपीच्या घरातून हॉलमार्क बॅच नंबर एमआरपी नसलेले ६५९ किलो ‘राघव’ नावाचे प्रतिबंधित बीजी ३ बियाण्यांची २२७ पाकिटे जप्त करण्यात आली. त्यांची अंदाजे किंमत एक लाख ८५ हजार ६१४ रुपये आहे. अनधिकृत बियाण्यांच्या पाकिटाची खरेदी पावती व इतर बियाणे संबंधित कागदपत्राबाबत विचारणा केली असता सदर आरोपी योग्य माहिती देऊ शकला नाही. मुद्देमालाचा पंचनामा करून काही बियाणे बीज प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आली.
वाचा:
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय बीज अधिनियम १९६७ चे कलम ७, ८, ९, १०, ११ व भादंविचे ४२० कालमान्वये तसेच महाराष्ट्र कापूस अधिनियम २००९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत कृषी विभाग अधिकार यवतमाळ राजेंद्र माळोदे, जिल्हा गुण नियंत्रक निरिक्षक दत्तात्रय आवारी, जिल्हा कृषी अधिकारी (सामान्य) नीलेश ढाकुलवार, कृषी अधिकारी पंकज बरडे, वणी तालुका कृषी अधिकारी सुशांत माने, शिरपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी राजू शेंडे सहभागी होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times