मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार (NCP ) यांनी करोना काळातील आरोग्य सुविधांवरून मोदी सरकारवर टीका केली होती. या टीकेला भाजपकडून आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर देत रोहित पवारांनाच आव्हान दिलं. ‘MLA हॉस्टेलच्या बांधकामासाठी ठाकरे सरकारने 900 कोटीचे टेंडर काढलं आहे. संसदभवनापेक्षा लसीकरणाकडे लक्ष द्या, असा पंतप्रधानांना सल्ला देणाऱ्या रोहित पवार यांच्या नजरेतून हे सुटलेलं दिसतंय. सांगा जरा मुख्यमंत्र्यांना, कोरोनाकडे लक्ष द्या म्हणावं. टक्केवारी काय तिथेही मिळेल त्यांना,’ असा पलटवार अतुल भातखळकर यांनी केला.

अतुल भातखळकर यांनी दिलेल्या आव्हानावर रोहित पवारांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘अतुल भातखळकरजी आपला मुद्दा मला योग्य वाटतो,पण टेंडर काढलं म्हणजे लगेच पैसे खर्च झाले असं नाही. टेंडर ते कामाचं बिल देणं याला किती वेळ लागतो,हे तुम्हाला माहीतच असेल! आमदार निवासाचं म्हणाल तर लांबून येणाऱ्या आमदारांसाठी ते महत्वाचं आहे, तरीही मी याबाबत मा.मुख्यमंत्र्यांशी बोलेन,’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

‘राजकारण बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा’
अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर रोहित पवार यांनी त्यांना एक सल्लाही दिला आहे.

‘तुम्हीही २२ हजार कोटी रुपयांचा सेंट्रल विस्टा प्रकल्प आणि १३ हजार कोटी रुपयांचं पंतप्रधान निवासस्थानाचं काम पुढं ढकलून लसीकरणाकडं लक्ष देण्यासाठी केंद्राकडं पाठपुरावा केला तर लसीकरणाबाबत आपल्या राज्यावरील अन्याय दूर होईल. सध्या राजकारण बाजूला ठेवून आपण लोकप्रतिनिधी म्हणून राज्यातील जनतेला केंद्रस्थानी ठेवून काम करूयात! मी काम करताना राजकारण बाजूला ठेवलंय, तुम्हीही एकदा प्रयत्न करुन बघायला काय हरकत आहे?’ असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here