पुण्यातील स्थिती पाहता कडक लॉकडाऊनचा सरकारने विचार करावा, अशा सूचना मुंबई हायकोर्टाने दिल्या होत्या. त्यामुळे पुण्यात खरंच संपूर्ण लॉकडाऊन होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र सध्या तरी शासनाने संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेणं टाळलं आहे.
‘ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र पुणे शहरात रुग्णसंख्या वाढलेली नाही, काही प्रमाणात ही संख्या कमी झाली आहे. बैठकीत आमदार-खासदारांनी काही सूचना केल्या. दुसऱ्या टप्प्यात रेमडेसिवीर, ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटरसाठी जी धावपळ करावी लागली ती तिसऱ्या लाटेत करायला लागू नये, यासाठी बैठकीत चर्चा झाली,’ असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांची प्रतिक्रिया, जाणून घ्या ठळक मुद्दे :
– ससूनसह काही ठिकाणी ऑक्सिजन प्लँट सुरू झाले आहेत
– लसींचा पुरवठा कमी असल्याने अडचण होत आहे.
– लसींच्या पुरवठ्याबाबत मी अदर पूनावाला यांना फोन लावला होता, पण ते अजून परदेशात असल्याचं सांगण्यात आलं.
– पूनावला हे पुढील १०-१२ दिवस तिकडेच राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पूनावाला यांचा तिकडचाही संपर्क क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times