नवाब मलिक पत्रकारांशी बोलत होते. भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी आता करोनावर बोलत आहेत. यापूर्वी विरोधक जे बोलत होते, तेच आता स्वामी बोलत आहेत. देशात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा देखील तुडवडा भासत आहे. मोदी यांचे काहीच नियोजन नाही. आधी स्वत:कडे अधिकार घेतले आणि आता परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून केंद्र सरकार हात झटकत आहे. देशातील परिस्थिती पाहता आता सर्वपक्षीय बैठक बोलवून निर्णय घेण्याची गरज आहे, एकटे मोदी कोरोनाशी लढू शकत नाही, असे मलिक म्हणाले.
पॉझिटिव्हिटीचा दर हा रॅपिड अँटीजन टेस्ट केल्यावर ६० टक्क्यांवर जात असल्याचे दिसते. जर आरटीपीसीआर चाचण्या केल्या तर परिस्थिती बिकट होईल. चाचण्या केल्यास बाधितांची संख्या १० लाखपर्यंत जाऊ शकते. लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही असे मलिक म्हणाले. ही परिस्थिती लक्षात घेत सर्व देशातील नेत्यांची बैठक मोदींनी बोलवावी आणि परिस्थिती समजून घ्यावी अशी माझी मागणी आहे.
क्लिक करा आणि वाचा-
करोनाशी दोन हात करण्यासाठी परदेशातून सामान येत आहे. परंतु, त्याचे वाटप होत नाही. मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे आणि परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे, असे सांगताना केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची ऑर्डर द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
क्लिक करा आणि वाचा-
भाजपवर सोडले टीकास्त्र
पश्चिम बंगालमध्ये भाजपची हार झाल्यानंतर देशात मोदींविरोधात वातावरण तयार होत आहे. यावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजप ममतादीदींची बदनामी करत आहे. त्यांच्याबाबत फेक व्हिडिओ टाकले जात आहे. बंगालमधील हिंसेचे कोणी समर्थन करत नाही, मात्र अशी बदनामी करणे गैर असल्याचे ते म्हणाले. किसान सन्मान निधी आणि मोफत लशीची घोषणा भाजपने केली होती. आता भाजपने हे आश्वासन पाळले पाहिजे असेही मलिक पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times