गडचिरोली: जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी कमी असून दुर्गम आणि आदिवासीबहुल भागात लसीकरणाबाबत असलेला गैरसमज दूर करून पूर्ण करणे हे प्रशासनासमोरील सर्वात मोठे आव्हान असल्याचे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते यांनी व्यक्त केली. ते आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. (the biggest challenge in is to complete says )

पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी हे मत व्यक्त केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रथम सिव्हिल हॉस्पिटल ला भेट देऊन पाहणी केली आणि रुग्णांना भेटून संवाद साधला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. आढावा बैठकीत वैदयकीय दृष्ट्या काय परिस्थिती आहे ते जाणून घेतली. यामध्ये त्यांना आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात लसीकरणाचा प्रमाण कमी असल्याचे आढळल्याचे सांगितले.

विशेष म्हणजे आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात काहीजण लसीकरणाबाबत जाणीवपूर्वक गैरसमज पसरवत असल्याने दुर्गम भागातील नागरिक लसीकरणासाठी समोर येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात लसीकरण करून घेणे हे प्रशासनासमोर सर्वात मोठे आव्हान असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले. जिल्ह्यात कोरोना प्रदूर्भावचा दर अजूनही २० टक्क्याचा वर असून येथील लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रशासनासोबतच सर्वांनाच मदत करावी लागत असल्याने त्याअनुषंगाने आमचे खासदार आणि आमदारांनी सुद्धा लोकांना जागृत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एकंदरीत प्रशासन जे प्रयत्न करत आहे त्यात आपल्याला मदत कशी करता येईल त्याबाबत मार्गदर्शन केल्याचे त्यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-
जिल्ह्यात सध्या बेड्स उपलब्ध असून जिल्हा प्रशासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले असून आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील कामकाजावर त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here