: भारतात करोनामुळे निर्माण झालेली गंभीर स्थिती अजूनही कायम आहे. या व्हायरसपुढे शासन-प्रशासन हतबल दिसत असताना लसींबाबतही गोंधळ निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत आहे. उपमुख्यमंत्री यांनी पुण्यात घेतलेल्या आढावा बैठकीनंतर याबाबतही भाष्य केलं आहे. तसंच आपण लसींच्या पुरवठ्याची माहिती घेण्यासाठी अदर पूनावाला यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

‘लसींचा पुरवठा कमी असल्याने अडचण होत आहे. त्यामुळे लसींच्या पुरवठ्याबाबत मी अदर पूनावाला यांना फोन लावला होता, पण ते अजून परदेशात असल्याचं सांगण्यात आलं. पूनावला हे पुढील १०-१२ दिवस तिकडेच राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पूनावाला यांचा तिकडचाही संपर्क क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न आहे,’ अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

दरम्यान, ‘सीरम इन्स्टिट्यूट’च्या अदर पूनावाला यांनी इंग्लंडला रवाना झाल्यानंतर भारतात लसींबाबत दबाव असल्याचा आरोप केला होता.

लॉकडाऊन ते करोनाची तिसरी लाट…अजित पवार काय म्हणाले?
विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर अजित पवार यांनी सविस्तर माहिती दिली. पुण्यात लगेच संपूर्ण लॉकडाऊन होणार नाही, असं म्हणत अजित पवारांनी वेगवेगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला. तसंच करोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य सुविधांबाबत आपल्याला मोठी धावपळ करावी लागली, तिसऱ्या लाटेची शक्यता असून तेव्हाही धावपळ करायला लागू नये म्हणून नियोजन करण्यात येत आहे, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here