मुंबई: येथे नवीन केंद्र सुरू करण्यात आले असून या कार्यक्रमाला डावलण्यात आल्याने काँग्रेसचे स्थानिक आमदार यांनी थेट शिवसेनेचे परिवहन मंत्री अॅड. यांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे वांद्रे पूर्वमधील शिवसेना विरुद्ध काँग्रेस हा जुना वाद पुन्हा उफाळून आला आहे. ( )

वाचा:
झिशान सिद्दीकी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. माझ्या मतदारसंघात लसीकरण केंद्र सुरू होत असताना प्रोटोकॉल म्हणून मला या कार्यक्रमाला निमंत्रित करणं अपेक्षित होतं. मात्र मला जाणीवपूर्वक डावलण्यात आलं, असं नमूद करताना आपण लसीकरणातही राजकारण करत आहोत का?, असा थेट सवाल सिद्दीकी यांनी अनिल परब यांना टॅग करून विचारला आहे.

वाचा:

झिशान सिद्दीकी यांनी एक व्हिडिओ संदेश पोस्ट करून त्या माध्यमातूनही परब यांना लक्ष्य केले आहे. ‘केवळ फोटोसाठी केलेल्या कामापेक्षा सच्चेपणाने केलेल्या कामाचे मोल नेहमीच अधिक असते’ असा टोला लगावत सिद्दीकी यांनी अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले. मी मतदारसंघात कामे करत असताना त्यात सातत्याने अनिल परब यांच्याकरवी अडथळे आणले जात आहेत. मला कामच करू दिले जात नाही. सातत्याने माझ्यावर दबाव आला जात आहे. एखाद्या कामासाठी महापालिकेची एनओसी वा अन्य परवानग्या लागणार असतील तर त्या मिळू दिल्या जात नाहीत. एच ईस्ट वॉर्डमधील भ्रष्टाचाराच्या तक्रारी मी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. मात्र अद्याप त्याची चौकशी करण्यात आलेली नाही. या चौकशीची भीती कुणाला वाटते आहे, हे मला माहीत नाही, असे नमूद करत सिद्दीकी यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या.

वाचा:

अनिल परब हे वरिष्ठ मंत्री आहेत. त्यांना हे वागण शोभत नाही. या मतदारसंघात शिवसेनेचे मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा मी पराभव केला हे वास्तव आहे. परब यांनी हे वास्तव आतातरी स्वीकारले पाहिजे. जनतेने मला कौल दिला आहे, त्याचा सन्मान त्यांनी राखावा, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच जनतेसाठी यापुढेही मी दबाव झुगारून काम करत राहणार, असे सिद्दीकी म्हणाले. मी मतदारसंघात काम करत असताना त्यात यापुढेही अडथळे आणले गेले तर येत्या काळात विधानसभेत आवाज उठवण्याचा इशाराही त्यांनी दिला. आदित्य ठाकरे माझे चांगले मित्र आहेत. काही गोष्टी मी त्यांना सांगितल्या आहेत. शिवाय मुख्यमंत्री यांच्याशीही मी याबाबत बोलणार आहे, असे सिद्दीकी यांनी सांगितले.

वाचा:

दरम्यान, महाविकास आघाडीतील एखाद्या पक्षाच्या आमदाराकडून थेट मंत्र्यावर आरोप करण्यात आल्याची ही पहिलीच घटना आहे. यानिमित्ताने वांद्रे पूर्वमधील शिवसेना विरुद्ध काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आल्याचेही दिसत आहे. वांद्रे पूर्व हा शिवसेनेचा गड मानला जात होता. मातोश्री निवासस्थान याच मतदारसंघात आहे. येथे गेल्या निवडणुकीत शिवसेनेतील बंडखोरीचा फायदा उठवत झिशान सिद्दीकी यांनी विजय मिळवला होता. हा निकाल शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला होता.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here