म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात शनिवार आठ मे पासून १३ मेपर्यंत जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर याबाबचे आदेश शुक्रवारी जारी केले. (Public curfew imposed in Osmanabad district from today till May 13)

राज्य सरकारने करोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्याच्या अनुषंगाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत पारित केलेल्या आदेशानुसार उस्मानाबाद जिल्ह्यात १५ मे रोजी सकाळी सात पर्यंत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. आठवड्यात शनिवार व रविवारी जनता कर्फ्यू ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आठ ते १३ मे पर्यंत सलग जनता कर्फ्यूची अंमलबजावणी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आठ मे सकाळी सात ते १३ मे सकाळी सातपर्यंत जनता कर्फ्यू राहील. अत्यावश्यक सेवा पूर्ण वेळ चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आलली आहे, असेही आदेशात म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

उस्मानाबादमध्ये ६६० नव्या रुग्णांचे निदान

दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यात आज शुक्रवारी ६६० नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले असून आज दिवसभरात एकूण आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here