ठाणे: जिल्ह्यात परिसरात बाधितांची संख्या वेगाने वाढत असल्याने संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत. नगरपरिषद क्षेत्रात उद्या (८ मे ) सकाळी ७ वाजल्यापासून ते १५ मे सकाळी सात वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा आदेश ठाण्याचे जिल्हाधिकारी यांनी आज जारी केला आहे. ( )

वाचा:

ठाणे जिल्ह्यात बदलापूर हा करोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. रुग्णसंख्या वाढत असताना शहरातील गर्दी मात्र कमी होत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. याबाबत गुरुवारी आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत निर्बंध कठोर करण्याबाबत सर्वांचे एकमत झाले होते. त्यानंतर याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी आज आदेश जारी केला आहे.

वाचा:

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बदलापुरात उद्या शनिवारपासून (८ मे) १५ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन राहणार आहे. यात वैद्यकीय सेवा, डॉक्टरांचे दवाखाने, औषध दुकाने, बँक सेवा वगळता बाकी सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. लॉकडाऊन दरम्यान कुळगाव बदलापूर नगरपरिषद क्षेत्रात किराणा, भाजीपाला, फळे, दूध डेअरी, बेकरी, मिठाई व सर्व प्रकारची अन्न पदार्थ विक्रीची दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत. त्याचवेळी या सर्व सेवा घरपोच देण्याची सवलत मात्र देण्यात आली आहे. या आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी. त्यात कोणतीही कुचराई झाल्यास व कुणी त्यास विरोध दर्शविल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here