सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टसंदर्भात पुरी यांनी आणखी काही ट्वीट करत काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस दुटप्पी भूमिका घेत आहे. काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने नव्या संसद भवनाची गरज व्यक्त केली होती. लोकसभा अध्यक्षांनी यासंदर्भात २०१२ मध्ये नगरविकास मंत्रालयाला पत्रंही लिहिलं होतं, असं पुरी म्हणाले.
करोनाच्या या काळातही काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष महाराष्ट्रात मनोरा आमदार निवास नव्याने बांधत आहेत. तर छत्तीसगडमध्ये नवीन विधानभवन बांधत आहे. मग सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टवर काँग्रेसला आक्षेप का आहे? असा सवाल पुरी यांनी केला.
दिल्लीतील २० हजार कोटींच्या खर्चाच्या सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टचा अंतर्भाव अत्यावश्यक सेवांमध्ये करण्यात आला आहे. यामुळे काँग्रेससह विरोधी पक्षांकडून याला विरोध होत आहे. या योजनेला पर्यावरणासंबंधीच्या प्राधिकरणाकडून मंजुरी देण्यात आली आहे. यानुसार पंतप्रधानांचे नवीन निवासस्थान हे डिसेंबर २०२२ पर्यंत बांधून तयार होईल. तर उपराष्ट्रपतींचे नवीन निवासस्थान हे पुढच्या वर्षी मेपर्यंत बांधून तयार होण्याची आपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times