वाचा:
सर्व प्रकारची आस्थापने, व्यावसायिक व दुकानदार यांना प्रशासनाकडून अनिवार्य करण्यात आलेली आहे. करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह असणेही बंधनकारक आहे. अशावेळी श्रीनाथ एक्स रे लॅबचा टेक्निशियन असलेला राहुल शिरसाट याने मात्र याबाबत बेजबाबदारपणा दाखवल्याचे उघड झाले आहे. शिरसाट याने करोना चाचणी करून घेतल्यानंतर त्यात तो करोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्याचा करोना चाचणी अहवाल १ मे रोजी मिळाला होता. त्यानंतर त्याने तात्काळ १४ दिवस विलगीकरणात राहणे आवश्यक असताना त्याने आपला निगेटिव्ह अहवाल ४ मे रोजी सादर करून एक्स रे लॅब सुरू केली.
वाचा:
लॅब उघडल्यानंतर राहुल शिरसाटने १०० च्यावर रुग्णांची तपासणी करून त्यांच्या जीवाशीच एकप्रकारे खेळ खेळला. पैसे कमावण्याच्या हेतुने त्याने ही कृती केली. शुक्रवारी मंगरूळपीर नगरपरिषद प्रशासनाला याप्रकाराची माहिती प्राप्त झाली. त्यावरून नगरपरिषद, पोलीस, महसूल प्रशासनाने गंभीर दखल घेत तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कारवाई केली. लॅब टेक्निशियन राहुल शिरसाट याला कोविड सेंटरला भरती करण्यात आले आहे तर नाथ डिजिटल एक्स रे लॅब तात्काळ सील करण्यात आली आहे. पोलिसांकडून राहुल शिरसाटवर आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times