नाशिक: कोविड-१९च्या परिस्थितीमुळे मृतांच्या संख्येत झापाट्याने वाढ होत असून परिणामी मृतांच्या नातेवाईकांना मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. या मुळे नागरिकांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या बाबीचा विचार करून मृतदेहांच्या विधीकरीता नागरीकांना होणारा त्रास कमी करणेच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेने Web Application (www.cremation.nmc.gov.in) तयार केलेले आहे. ( has created an )

हे अॅप्लिकेशन नाशिक महानगरपालिकेच्या e-connect Application ला देखील कनेक्ट करण्यात आलेले आहे. नागरीकांना या Application चा वापर करून आपल्या नजिकच्या अमरधाम येथील अंत्यसंस्काराबाबतची सद्यस्थिती जाणून घेता येईल व Application मध्ये आवश्यक माहिती भरून त्याना पाहिजे त्या विभागातील अमरधाम येथील स्लॉट बुक करता येणार आहे. स्लॉट बुक झाल्यानंतर संबंधिताला एक मेसेज येईल व त्या ठिकाणी आपण आपली बुकिंग रिसिप्ट सुद्धा डाउनलोड करता येणार आहे. या आप्लिकेशनच्या सहाय्याने नागरिकांना सर्व विभागात असलेल्या अमरधाम गुगल लोकेशनच्या माध्यमातून शोधणे सुद्धा सुलभ होणार आहे. हे अँप्लिकेशन आज रात्री १२ वाजेपासून सुरु करण्यात येणार आहे.

नाशिक शहरात सर्व विभागात एकूण १७ अमरधाम असून या अमरधाम मध्ये ८० बेड आहेत आणि नागरिकांना या अँप्लिकेशनमध्ये त्यांना त्या भागातील सेवा देणाऱ्या सर्व व्यक्तींचे नाव व मोबाइल नंबर दिलेला आहे. त्या माध्यमातून त्या ठिकाणची सध्याच्या स्थितील माहिती घेणे सुद्धा सुलभ होणार आहे.

क्लिक करा आणि वाचा-
या Application मुळे नागरिकांना करावी लागणारी प्रतीक्षा व मानसिक त्रास दूर होण्यास निश्चितच मदत होईल. याकरीता, कुठलेही शुल्क आकारले जाणार नसून, ही सुविधा हि मोफत आहे. तरी, नागरिकांनी या सुविधेचा वापर करून नाशिक महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here